Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  सैतानी धुंदी

  देवाच्या लोकांनी चिन्हाचे इशारे ओळखून ख्रिस्ताच्या येण्याच्या खूणा ओळखाव्यात. कारण त्याच्या येण्याची चिन्हे इतकी सोपी आहेत कीसंशय घेण्यास मुळीच जागा नाही. आणि ही चिन्हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सत्यामध्ये सुशिक्षित होणे आवश्यक आहे व जिवंत सुवार्ता प्रसारक होणे आवश्यक आहे. देव सर्वांना पाचारण करतो मग तो कोणीही असो. सर्वांनी जागृत व्हावे. सर्व स्वर्ग हालचाली करीत आहे. जगाचा देखावा हा पृथ्वीचा इतिहास लवकरच संपत आहे. आम्ही शेवटच्या दिवसाच्या धोक्यामध्ये आहोत. आपल्या समोर मोठे संकट आहे. आणि तरीही आम्ही अजून जागे झालो नाही. ही कार्य करण्याची कमतरता आणि कार्याचा निष्काळजीपणा. यामुळे देवाला त्रास होतो. ही मरणाची धुंदी सैतानापासूनची असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:२६०, २६१. ChSMar 55.1

  अविश्वास, जसे प्रेतावर पसरलेले कफन हे आपल्या मंडळ्या भोवती पसरले आहे. कारण देवाने दिलेल्या देगण्यांचा वापर करीत नाही आणि जे देवाच्या सत्यप्रकाशाला वंचित झाले आहेत ते दुर्दैवी आत्मे सत्यापासून दूरच आहेत. त्यांना देवाचे अनमोल सत्य ठाऊक नाही. जे सत्यामध्ये आनंद उपभोगतात ते ज्यांना सत्याचा प्रकाश ठाऊक नाही त्यांना प्रकाशामध्ये घेऊन जातात. - द जनरल कॉन्फरन्स बुलेटिन. १८९३, १३३.ChSMar 56.1

  आता सैतान देवाच्या उत्साही लोकांना शोधतो जे उत्साहाने कार्य करतात. जे देवाचा प्रकाश लोकांना दाखवितात त्यांना सत्य सांगतात. त्यांचे लक्ष सैतान विचलित करतो. त्यामुळे ते त्यांच्या कार्यामध्ये उणे पडतात. तागडीत तोळल्यावर ते उणे पडतील व त्यांचा नाश व्हावा असे सैतान करतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:२६०. ChSMar 56.2

  लोक संकटात आहेत अनेक लोक त्रासात आहेत, परंतु थोडे लोक कसे अंधरातील आत्म्यांसाठी ख्रिस्ताचे ओझे घेऊन त्याचे कार्य करीत आहेत. जगाचे प्रारब्ध तागडीमध्ये आहे. पण ते क्वचितच हलते. काहीजण दावा करतात की त्यांचा विश्वास आहे की देवाचा सत्य प्रकाश सर्वत्र पसरला आहे. एवढेच नाही परंतु मृत लोकांनाही समजले आहे. येथे प्रीतिची कमतरता आहे जेथे ख्रिस्त स्वर्गातून मनुष्य रुपाने या जगामध्ये आला त्याच्या स्वर्गीय कुटूंबामधून मनुष्य स्वभाव घेऊन आला म्हणजे मनुष्यामध्ये ख्रिस्ताची प्रीति मनुष्यामध्ये पसरेल व स्वर्गीय प्रीतिशी त्यांची युती होईल. ख्रिस्ताचे प्रेम मानवामध्ये उतरल्यास ईश्वरी प्रीति त्यांच्यामध्ये येईल. याचबरोबर देवाच्या लोकांवर त्यांच्या मनावर धुंदी आली आहे. यामुळे ते आपले कर्तव्य विसरले आहेत. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन, ३०३. ChSMar 56.3

  झोपाळू, आळशी आणि उदास असे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा वापर सैतान करुन घेतो आणि आपली शक्ति वाढवितो व त्यांच्याकरवी अनेक आत्मे स्वत:कडे ओढून घेतो. अनेकजण असा विचार करतात की जरी आम्ही ख्रिस्ताचे कार्य करीत नाही तरीही आम्ही त्याच्याच बाजूने आहोत. अशा लोकांमध्ये शत्रु आपली जागा तयार करतो आणि त्याचा फायदा करुन घेतो. अशा प्रकारे त्यांच्या कार्याचे अपयश त्यांच्याच पदरी पडते. कारण धन्याने सोपवून दिलेले कार्य ते पूर्ण करु शकत नाहीत. अशा प्रकारे ख्रिस्ताचे सत्य त्यांच्या मुखातून बाहेर पडत नाही याचा सैतान फायदा घेतो. असेच लोक आत्म्यावर नियंत्रण करण्यासाठी त्याला संधी देतात. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २८०.ChSMar 56.4

  जेव्हा मी बायबलचा अभ्यास करतो तेव्हा मला देवाच्या इस्ताएलांची शेवटच्या दिवसांची सूचना मिळते. त्यांना मूर्तिपूजेकडून पळून जाण्यासाठी प्रवृत्त केले. मला भिती वाटते की ते झोपले आहेत. त्यांनी जगाशी जुळवून घेतले आहे. यामुळे तो आणि त्यांच्यामध्ये असणारा देव आणि त्याच्या सेवकांमध्ये अडचणी निर्माण होतात. कारण जुन्या इस्त्राएल आणि त्यांच्या घाणेरड्या सवयी इस्त्राएल लोकांना लागल्या होत्या. देवाचे हे सेवक त्यामुळे देवाची सेवा करीत नाहीत. देव आणि त्याच्या लोकांमधील अंतर वाढतच जात आहे. आणि जग व त्यांच्यातील अंतर कमी होत आहे. ख्रिस्त आणि त्याचे विश्वासी लोकांमधील संबंध संपल्यात जमा आहेत. जगामध्ये ते संपले आहेत जसे की पुरातन इस्त्राएल ते सुद्धा त्यांच्याभोवती असणाऱ्या जगामध्ये गुंगून गेले आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:२७७.ChSMar 57.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents