Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  एका आत्म्याचे प्रेक्षक

  ख्रिस्ताचे कार्य मोठ्या प्रमाणात केल्याचे एक वैयक्तिक मुलाखतीमध्ये सांगितले त्याच्यासाठी त्याला एक आत्म्याच्या प्रेक्षकाचा सन्मान वाटतो. एका आत्म्याकरवी हजारो आत्मे मिळतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:११५.ChSMar 148.2

  तो थकण्याने गळून गेला होता. तरीसुद्धा त्याने त्या अनोळखी इस्त्राएलाला परकी असलेली आणि साक्षात पापी जीवन जगणाऱ्या स्त्रीबरोबर बोलण्याची संधी दुर्लक्षिली नव्हती. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १९४. ChSMar 148.3

  मोठा जमाव जमण्याची येशून कधीच वाट पाहिली नव्हती बहुधा त्याच्या सभोवती जमलेल्या थोड्याच लोकांना संदेश देण्यास तो सुरुवात करीत होता. परंतु त्या बाजूने येणारे जाणारे अनेक लोक तेथे थांबत व त्यामुळे तेथे मोठा समुदाय तयार होत होता व तो समुदाय देवाने पाठविलेल्या गुरुकडून देवाचे वचन मोठ्या उत्सुकतेने व अचंबा करीत ऐकत होते. येशूच्या कामगारांना असे समजूच नये की मोठ्या लोकसमुदायासमोर जितक्या उत्सुकतेने बोलू शकतो तितक्या लहान लोक समुदायासमोर बोलू शकत नाही. संदेश ऐकण्यासाठी कदाचित एकच आत्मा असेल, परंतु संदेशाचा परिणाम त्याच्यावर किती मोठा होईल हे कोणाला माहीत आहे ? जगाच्या तारणाऱ्याने केवळ एक शमरोनी स्त्रीसाठी वेळ खर्ची घालावा ही गोष्ट शिष्यांनासुद्धा क्षुल्लक वाटली होती. तथापि तो राजे सभापती आणि मुख्य याजक यांच्यापेक्षा तिच्याशी अगदी मनापासून व परिणामकारकरित्या बोलत होता. त्याने त्या स्त्रीला दिलेल्या शिकवणीची पुनरार्वत्ति जगाच्या कोनाकोपऱ्यात होत राहिली आहे. व्यक्तिगत परिश्रमा करवी लोकांच्या निकट येण्याची गरजा जर उपदेश करण्यामध्ये कमी वेळ लागेल तर आणि व्यक्तिगत सेवा करण्यामध्ये जास्त लागला तर त्याचे परिणाम चांगले होती. - द मिनीस्ट्री ऑफ हिलिंग १४३.ChSMar 148.4

  या जगिक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला प्रभुच्या कृपेचा संदेश दिला पाहिजे अशी प्रभुची इच्छा आहे. हे कार्य संपादन करण्यासाठी व्यक्तिवाचक कार्याची फार मोठी गरज आहे. हीच ख्रिस्ताची पद्धत होती. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २२९.ChSMar 149.1

  आत्मे जिंकण्यामध्ये ज्या स्त्री आणि पुरुषांनी अनेक आत्मे जिंकण्यामध्ये यश मिळविले आहे. त्याबद्दल त्यांना गर्व होत नाही, परंतु त्यांनी आपल्या दयेने आणि विश्वासाने हे आत्मे जिंकण्याचे सहाय्य केले आहे. ख्रिस्ताने हे कार्य अशाच प्रकारे केले आहे. तो त्यांच्याच जवळ आला ज्यांची तशी इच्छा होती. - गॉस्पल वर्कर्स १९४.ChSMar 149.2

  ख्रिस्ताच्या सहानुभूतीने आम्ही लोकांशी वैयक्तिक संपर्क साधावा व त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनाच्या गोष्टींची गोडी निर्माण करावी. वाटेप्रमाणे त्यांचे अंत:करण कठीण असू शकेल आणि तारणारा यशूची माहिती त्यांना सांगणे हे निरर्थक वाटेल. त्यांना सुवार्ता सांगण्याबाबत युक्तिवाद चालणार नाही. वाद संवाद करुन त्यांचा पालट होणार नाही, पण आपल्या वैयक्तिक सेवेतील ख्रिस्ताची प्रीति प्रगट केली तर त्यामुळे त्यांचे कठीण अंत:करण हे मऊ किंवा विचारी होऊन सत्याचे वचनरुपी बीज रुजू लागेल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ५७.ChSMar 149.3

  तुमच्याभोवती जे आहेत त्यांच्यापर्यंत तुमचे वैयक्तिक कार्य पोहोचेल. त्यांच्याशी ओळख करुन घ्या. उपदेश किंवा प्रवचन देऊन तुमचे कार्य साध्य होणार नाही. या कार्यामध्ये देवाचे दूत तुमच्या बरोबर असतील ज्यांच्या भेटीला तुम्ही जाल तेथे ते तुम्हाला सहाय्य करतील. हे कार्य प्रतिनिधीत्वाने होणार नाही. पैसे घेऊन किंवा मोबदल्याने हे कार्य होणार नाही. भाषणे देऊन होणार नाही. त्यांना भेटी देऊन आस्थेने त्यांची चौकशी करुन त्यांच्याबरोबर प्रार्थना करुन दया दाखवून त्यांची मन जिंकू शकाल. हेच उच्च मिशनरी कार्य आहे जे तुम्ही करु शकता. हे करण्यासाठी तुम्हाला निग्रह, स्थिरता व चिकाटी व विश्वास असावा. धीर असावा व खोल प्रीति असावी तरच ते आत्मे देवाकडे येतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९.४१.ChSMar 149.4

  योहान, आंद्रिया, शिमोन, फिलिप आणि नथनेल यांना पचारण करुन ख्रिस्ती मंडळीच्या पाया रचायला सुरुवात झाली. योहानाने आपल्या दोन शिष्यांना येशूकडे पाठविले. नंतर त्यांच्यापैकी एक आंद्रिया याने आपल्या भावाला उद्धारकाकडे आणिले मग फिलिप्पाला बोलावण्यात आले आणि मग तो नथतेलाच्या शोधात गेला. या उदाहरणावरुन आम्हाला वैयक्तिक कार्याचे महत्त्व समजले पाहिजे. आपले नातेवाईक स्नेही आणि शेजारी यांच्याशी चांगला घरोबा ठेवावा. आयुष्यभर ख्रिस्ताचा निकटचा प्रयत्न करणारे असेही लोक आहेत. या कामाची सर्व जबाबदारी ते पाळकावर टाकतात. पाचरणासाठी तो लायक असू शकेल, परंतु देवाने मंडळीतील सभासदांनी करावयाचे काम ते करीत नाहीत. प्रेमळ ख्रिस्ती लोकांच्या स्त्रीपुरुषांनी शर्तीचे प्रयत्न केले असते तर अनेक लोक नाशापासून बचावले असते. वैयक्तिक भेटीची पुष्कळजण अपेक्षा करीत आहेत. ज्या गावात आपण राहतो तेथे, कुटुंबात आसपासच्या प्रांतात ख्रिस्ताचे मिशनरी म्हणून काम केले पाहिजे. आपण जर ख्रिस्ती आहोत तर असल्या कामाने आम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. पालट झालेल्या व्यक्तिच्या मनात मिळालेला मौल्यवान मित्र येशू याच्याविषयी इतरांना सांगण्यास ताबोडतोब प्रबल इच्छा निर्माण होईल. तारदायी आणि पवित्र करणारे सत्य अंत:करणात दाबून बसू शकणार नाही.ChSMar 149.5

  एक अति प्रभावी परिणामी मार्ग जो प्रकाशाचे दळणवळण करतो, तो म्हणजे खाजगी आणि वैयक्तिक कार्य. ते म्हणजे तुमच्या घरातील कुटूंब वर्तुळामध्ये तुमचे शेजारी, आजारी रुग्णाच्या बिछान्याजवळ शांतपणे बायबल वाचून धिम्या आवाजामध्ये ख्रिस्ताशी संभाषण करुन त्याला समस्या सांगणे आणि ख्रिस्ताच्या सत्याविषयी सांगून त्यांच्या विश्वासामध्ये वाढ करु शकतो. असे केल्याने वचनाचे बी त्याच्या अंत:करणात पेरुन सुरुवात करु शकतो. तसेच वरचेवर वचनाचे खत पाणी घालून चांगली फळे आणण्यास आपल्याला यश मिळू शकते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४२८, ४२९. ChSMar 150.1

  ज्या पदार्थात मीठ घालण्यात येते त्यात ते मिसळले पाहिजे. त्यात शिरुन त्याचा अर्क त्यात उतरला पाहिजे. तसेच वैयक्तिक संबंधामुळे, सहभागामुळे लोकांपुढे सुवार्तेचे तारणादायी सामर्थ्य सादर केले पाहिजे. घोळक्याने त्यांचा उद्धार होत नाही, परंतु वैयक्तिक प्रभाव हे सामर्थ्य, शक्ति आहे. ज्यांचे कल्याण व्हावे अशी आपली इच्छा आहे. त्यांच्या समीप आपण आले पाहिजे. - थॉटस फ्रॉम द माऊंट ऑफ ब्लेसिंग ३६.ChSMar 150.2

  ज्याला त्याच्या राज्याचे आमंत्रण द्यायलाच पाहिजे अशी व्यक्ति प्रभुला प्रत्येक व्यक्तित दिसत होती. लोकांच्या हिताची इच्छा बाळगणारा या नात्याने त्यांच्यामध्ये वावरुनच तो त्यांच्या अंत:करणा पर्यंत भिडला त्याने त्यांचा हमरस्त्यावर, खाजगी घरात; जहाजावर, मंदिरात, सरोवराच्या काठी आणि लग्नाच्या मेजवाणीच्या ठिकाणी शोध केला. त्याच्या फावल्या वेळात तो त्यांना भेटला. त्यांच्या सामाजिक बाबीत आस्था दाखविली. त्याच्या पवित्र सान्निध्याच्या प्रभावाखाली त्याने अनेक कुटुंबांना त्याच्या स्वत:च्या घरात जमवून त्याने त्याची शिकवण सर्व कुटुंबियामध्ये पोहोचविले. त्याच्या सहानुभूतिमुळे त्याला लोकांची मने जिंकण्यास मदत झाली. - द डीजायर ऑफ एजेस १५१. ChSMar 151.1

  केवळ ख्रिस्ताच्या पद्धतीनेच लोकापर्यंत पोहोचण्यामध्ये यश प्राप्त होते. मुक्तिदाता लोकांचे भले करण्याचे इच्छेनेच त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहतो. त्याने आपली सहानुभूति त्यांच्यासाठी जाहीर केली. त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. आणि त्यांचा विश्वास जिंकला. तेव्हाच तो म्हणाला, “माझ्यामागे या” - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग. १४३.ChSMar 151.2

  ज्याप्रमाणे ख्रिस्त बोलला तसे आपण बोलावे. ख्रिस्त जेथे कोठे होता. सभास्थानात, रस्त्याकडेला, बोटीत असताना, परुशी, लोकांची मेजवानी केली किंवा जकातदाराशी बोलताना त्यावेळी त्या लोकांना सार्वकालिक जीवनाविषयी बोलला. निसर्गातील वस्तुगण, दररोजचे जीवन यावरुन येशू सत्याशी सांगड घालून बोलत असे. लोकांची अंत:करणे येशूकडे आकर्षित झाली होती. कारण त्यांना आजाऱ्यांना बरे केले, पिडीतांचे समाधान केले. त्यांची लेकरे मांडीवर व हातावर घेऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. जेव्हा येशू बोलू लागला तेव्हा लोकांचे लक्ष त्याच्याकडे खिळून राहात असे, आणि त्याचे शब्द काही लोकांना जीवनदायी जीवन असे होते. अशाच प्रकारे आमचेही झाले पाहिजे आम्ही जेथे कोठे असू वा जाऊ तेथे आपण लोकांना तारणारा येशू विषयी कसे काय सांगणे ही संधी वा प्रसंग पाहाणे. आम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करणे म्हणजे लोकांना मदत करणे. याद्वारे लोकांची अंत:करणे उघडली जातील. हे एकाएकी घडू शकत नाही तर स्वर्गीय प्रीतिने युक्त होऊन आपण लोकांना सांगू शकू की तो लाखात मोहरा आहे आणि तो सर्वस्वी मनोहर आहे. गतिरत्न ५:१०,१६. आपल्या सर्वश्रेष्ठ दानाचा या सेवेसाठी उपयोग करु शकतो. हे दान भाषा कौशल्य आम्हाला यासाठी दिले की आपण ख्रिस्त हा पापक्षमा करणारा आहे हे सांगावे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३३८, ३३९. ChSMar 151.3

  त्याच्या सहवासाने घरामध्ये शुद्ध वातावरण निर्माण होत असे आणि त्याचे जीवन समाजामध्ये खमीराप्रमाणे कार्य करीत होते. निरुपद्रवी आणि निष्कलंक असा तो, अविचारी, असभ्य व असंस्कृत लोकांमध्ये अन्यायी जकातदार, बेफिीकीर, उधळपट्टी करणारे, अधार्मिक शोमरोनी, विधर्मी सैनिक, आडदांड शेतकरी आणि मिश्र समुदाय यांच्यामध्ये तो वावरत असे. थकले भागलेल्यांना पाहून आणि त्यांचे भारी ओझे हलके करण्यासाठी सहानुभूतीची शब्द तो सर्वत्र बोलत होता. त्याने त्यांचे ओणे वाहिले आणि निसर्गामध्ये शिकलेले प्रेम, दयाळूपणा आणि देवाच्या चांगुलपणाचे धडे त्याने त्यांना सांगितले.ChSMar 152.1

  प्रत्येकाला अमुल्य देणगी लाभलेली आहे असे समजून त्यांनी वागले पाहिजे. असे त्याने त्यांना सांगितले. त्या देणगीचा योग्य उपयोग केल्यास त्यांना अनंत दौलत लाभू शकते. त्याने सर्व निरर्थक गोष्टी आपल्या जीवनातून पार काढून टाकल्या आणि प्रत्येक क्षणाची निष्पती अनंतकालिक आहे हे त्याने स्वत:च्या उदाहरणाने शिकविले. तो मौल्यवान खजिना म्हणून अंत:करणात साठवून ठेवावा व त्याचा विनियोग पवित्र कार्यासाठी करावा असे सांगितले. निकामी व्यक्ति म्हणून त्याने कोणाकडे पाहिले नाही, परंतु त्यांना मुक्ति प्राप्त करुन देण्याचा त्याने प्रयत्न केला. कोणत्याही मंडळीच्या सहवासात तो आला तेव्हा वेळ आणि परिस्थिती पाहून त्याने त्यांना उचित पाठ दिला. निरुपद्रवी व अहस्य बनण्याची खात्री देऊन जे आडदांड व होतकरु नसलेले त्यांना आशा देऊन प्रेरित केले व हे गुण प्राप्त झाल्याने ती देवाची मुले बनतील असे सांगितले. सैतानाच्या सत्तेखाली गेलेले व त्याच्या कचाट्यातून सुअण्यास असमर्थ असलेले लोक त्याला वारंवार भेटले. यशाची खात्री देऊन त्यांना चिकाटी न सोडण्यास उत्तेजन दिले. कारण दिव्य दूत त्यांच्या बाजूने असून ते त्यांना विजय प्राप्त करुन देतील. - द डिजायर ऑफ एजेस ९०. ChSMar 152.2