Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  विश्वास

  देवाच्या कायकर्त्यांचा त्यावर विश्वास हवा. त्यांच्या श्रमाचा त्याला विसर पडत नाही. त्यांच्या कामाची तो कदर करतो. परमेश्वरासोबत श्रम करणाऱ्यांच्या सहकार्यास दैवी समित्याची नेमणूक केलेली आहे. जेव्हा आपण विचार करतो की देव जस सांगतो तस तो करत नाही किंवा त्याच्या कामकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्याच्यापाशी वेळ नाही. तेव्हा आपण आपल्या उत्पन्न कर्त्याचा अवमान करतो. - द सदर्न वॉचमन - ऑगस्ट २, १९०४.ChSMar 270.2

  देवाच्या कामकऱ्यास प्रबल विश्वास हवा. जरी दिसण्यास भितीदायक असेल तरी प्रत्येक काळोखाच्या प्रहारापुढे प्रकाश असतो. विश्वास व प्रितीने परमेश्वराची सेवा करण्यास जे समर्थ आहेत ते दिवसागणिक आशीर्वादीत होतील. - गॉस्पल वर्कर्स - २६२.ChSMar 270.3

  अस्सल विश्वासात उल्हास तत्त्वामध्ये स्थिरता व उद्देशा प्रती ठामपणा ज्याला काळ व परिश्रम हतबळ करु शकत नाहीत. - ख्राइस्ट ऑब्जक्ट लेसन्स १४७.ChSMar 270.4

  अनेकदा ख्रिस्ती जीवन धोक्यांनी घेरलेले असते आणि त्याच्याशी सामना करणे कठिण वाटते आणि समोर नाश ठेवलेला आहे व त्या पाठोपाठ गुलामी वा मृत्यु असे कल्पनाचित्र आपल्या समोर उभे राहते, तरी यातही परमेश्वराचा आवाज स्पष्टपणे सांगतो, ‘पुढे जात रहा’ आपण त्याचे आज्ञा पालन करायाल हवे, जरी आपले नेत्र अंधकाराचा छेद घेऊ शकत नाहीत. आपले पाय जड झाल्याप्रमाणे वाटत आहेत तरीही. शंकेखोर व थांबलेल्या मनाच्या लोकांपुढील अडचणी, ज्या त्यांच्या प्रगतीस अडथळे अशा आहेत त्या कधीच नाहीश्या होत नाहीत. अनिश्चीतेच सावट नष्ट होईल आणि पराजय किंवा अपयश याने काहीच फरक पडणार नाही. अशा विश्वासात जे कमी पडत असतील, तर ते विश्वासणारे नव्हतेच. अविश्वास कुजबुजतो ‘अडथळे संपेपर्यंत आपण थांबून घेऊ, नंतर आपण स्पष्टपणे आपला मार्ग पाहू” परंतु विश्वास धाडसाने पुढे जाण्यास सुचवितो, सर्व गोष्टींची आशा धरुन आणि सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून. - पॅट्रिआर्चस अॅन्ड प्रॉफेटस् २९०.ChSMar 270.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents