Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रोफेशन विए एक्सप्रेशन

    प्रत्येक महत्त्वाचे सत्य प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचायला हवे. प्रत्येक मनुष्याने त्याचा स्वीकार करावा आणि या सत्याचा स्वीकार करण्याचे प्रमाणे म्हणजे ख्रिस्ताची प्रीति आणि त्याच्या सामर्थ्याची घोषणा सर्व लोकांना करणे. ही घोषणा त्यांच्या अंत:करणात तीव्र आणि खोल गेलेली असते. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १९ फेब्रुवारी १८८९.ChSMar 122.2

    चांगल्या कार्यासाठी आपल्या विश्वासामध्ये विपुलता हवी आहे. कारण कार्याविणा विश्वास मृत आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:१४५.ChSMar 122.3

    ज्या कोणाच्या हृदयामध्ये सुवार्ता प्रसाराचा संदेश मिळाला आहे. ते दीर्घकाळ संदेश देतील. स्वर्गातून जन्मलेल्या ख्रिस्ताचे प्रेम व्यक्त होणे आवश्यक आहे - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन १२५.ChSMar 122.4

    आम्ही देवाची भक्ति व सेवा मूर्तपणे आपल्या सर्व सामर्थ्यानिशी करावी. त्याच्या नावाचे गौरव करावे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३००.ChSMar 122.5

    तिसऱ्या देवदताच्या सिद्धांतावर संदेशावर आपला विश्वास किंवा संमतीशिवाय थांबवू नये. आपल्या जवळ ख्रिस्ताच्या कृपेचे तेल असावे. ते आपल्या दिसण्यासाठी पोषक असे ठरते. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रकाश सर्वत्र पसरेल. म्हणजे जे अंधारात आहेत त्यांना तो प्रकाश असा होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१५५.ChSMar 122.6

    तुम्ही जे चांगले कार्य व प्रेम करता हे तुमच्या आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे प्रमाणे आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ३:५२६.ChSMar 122.7

    प्रत्येकाजवळ सत्याचा प्रकाश असता तर त्याचा वापर करुन त्यांनी ख्रिस्तासाठी बरेच मोठे कार्य केले असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४०.ChSMar 122.8

    मला दाखविण्यात आले होते की आपल्या लोकांमध्ये कमतरता आहे. आपले कार्य आपल्या विश्वासाप्रमाणे नाही. आपल्या विश्वासाची कसोटी म्हणजे आपण ईश्वरी पवित्र संदेशाच्या काळामध्ये जगत आहोत. आणि हा शेवटच्या काळासाठी अति महत्त्वाचा संदेश आहे. नश्वर जगासाठी हा संदेश आहे. तरीही आमचे काय म्हणावे तितके तातडीचे, जोराचे आणि आत्मियतेने होत नाही. यासाठी आम्ही कष्ट घेत नाही आपला आत्मा यासाठी समर्पित नाही. या कार्याची स्वभावा बरोबर तुलना करु नये, वर्णाशी करु नका. आम्ही मरणातून जागे व्हावे आणि ख्रिस्त आपणास जीवन देईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:११४.ChSMar 123.1

    विश्वासाने पुढे जा आणि जो तुमचा विश्वास आहे तो जाहीर करा. ज्यांना तुम्ही सुवार्ता सांगता किंवा संदेश देता त्यांना तुमच्यामध्ये ती सत्यता दिसून येऊ दे. त्यास त्याचा तुमच्यातील जिवंतपणा त्यांना दिसू दे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४२.ChSMar 123.2

    ख्रिस्ती जीवनातील ख्रिस्तासारखे राहणीमान हे मोठे सामर्थ्यवान असते. हा अति महत्त्वाचा युक्तिवाद आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२१.ChSMar 123.3

    अनेकजण ख्रिस्ताच्या नावाला प्राधान्य देतात, परंतु त्यांची मने ख्रिस्ताच्या सेवेमध्ये नसतात. ते केवळ स्वत: ख्रिस्ताच्या नावाची प्रशंसा करतात ते स्वत:चीच ख्रिस्ता विषयीची रचना करतात. अशाप्रकारच्या त्यांच्या कृतिमुळे ते स्वत:चेच मोठे नुकसान करुन घेतात. आणि स्वत:चीच मोठी फसवणूक करुन घेतात. आणि स्वत: सैतानीचे ते हस्तक बनतात. - द रीव्हिव्ह हेरॉल्ड २७ मार्च १८८८.ChSMar 123.4

    प्रभूच्या येण्याविषयी जागृत राहणे सत्याचे पालन करु अंतरंग शुद्ध करुन घेतात, दक्षतेने जागृत राहून कळकळीने कार्य करणे करितात. प्रभू दारात आहे हे जाणून आत्म्याच्या तारणासाठी कार्य करण्यास दिव्य बुद्धी चातुर्याशी सहकार्य करण्यास त्याचा उत्साह प्रज्वलित झाला आहे. प्रभूच्या परिवाराला “यथाकाळी त्याच्या वाट्याची शिधा सामुग्री देणारे हे विश्वासू व विचारशील दास आहेत. सध्या व्यवहार्य असलेले सत्य ते जाहीर करीत आहेत. हनोख, नोहा, आब्राहाम आणि मोशे यांनी त्याच्या काळासाठी लागू असलेले सत्य घोषित केले तसेच ख्रिस्ताचे दास त्यांची पिढीला व्यवहार्य असलेला विशिष्ट इशारा देतात. - द डीझायर ऑफ एजेस ६३४.ChSMar 123.5

    मिळालेल्या प्रकाशाच्या प्रमाणावर देवाच्या समोरील आमची योग्यता दर्जा अवलंबून नाही, परंतु जे काही जवळ आहे त्याचा आम्ही कसा उपयोग करतो यावर अवलंबून आहे. शक्यतो योग्य फरक करुन निवड केलेल्या विदेशी लोकांचे देवासमोरील स्थान, ज्यांना अधिक प्रकाशि मिळाला आहे आणि देवाची सेवा करण्याचे विदित करतात, परंतु दैनंदिन व्यवहारात ते प्रकाशाचा अवमान करतात त्यांच्यापेक्षा अधिक अनकूल आहे. - द डिझायर ऑफ ऐस २३९.ChSMar 124.1

    प्रत्येक ख्रिश्चनांना संधी आहे की केवळ पुढे पाहण्यासाठी नाही, परंतु ख्रिस्ताच्या लवकर येण्याकडेही लक्ष असावे. सर्व ख्रिस्ताचे नाव धारण करणाऱ्यांना त्याच्या गौरवाच्या फळांची अपेक्षा करणाऱ्यांनी ताबडतोब सुवार्ता प्रसाराचे बीज जगभर पेरण्याचे कार्य करावे. शेवटचे महान पीक लवकर तयार होणे आवश्यक आहे. आणि ख्रिस्ताने लवकर येऊन आपले अनमोल पीक गोळा करण्यास यावे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ६९.ChSMar 124.2

    ख्रिश्चनांनी स्वत: उठून जे कार्य दुर्लक्षित केले ते हाती घ्यावी. त्यांच्या आत्म्याचे तारण त्यांच्या स्वत:च्याच कष्टावर अवलंबून आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २३ ऑगस्ट १८८१.ChSMar 124.3

    ख्रिस्ताबरोबर एकत्र कार्य करणे हीच खरी उपासना. प्रार्थना उपासना आणि उपदेश ही मुख्य फळे आहेत जी इतरांना द्याची असतात. ही फळे योग्य स्पष्टीकरण करण्यास योग्य असतात. यामुळे चांगले कार्य होते. गरजवंतांची योग्य काळजी घेतात. अनाथ, विधवा व गरीबांची काळजी घेण्यासाठी या चांगल्या फळांच्या वृक्षाची गरज असते. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १६ ऑगस्ट १८८१.ChSMar 124.4

    मंडळीच्या सभासदांना वैयक्तिकपणे नेमलेली वेळ घेऊन त्यांना मिळालेला प्रकाश इतरांना देण्याचे अगत्य आहे. देवाच्या मळ्यातून कार्य न करण्याची कोणतीही सबब त्यांना असू नये. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १९ फेब्रुवारी १८८९. ChSMar 124.5

    ख्रिस्ती तत्त्वांची फळे ख्रिस्ती सभासदांना स्वत:जवळ वागवावित अशी ख्रिस्ताची अपेक्षा आहे. अनाथ, गरीब आणि विधवा यांच्यासाठी त्यांच्यामध्ये सहानुभूती असणे, दया दाखविणे व हवी ती मदत करणे हे ख्रिस्ती सभासदाचे प्रथम कर्तव्य आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १६ ऑगस्ट १८८१.ChSMar 124.6

    याकोबाच्या विहीरीवर शमरोनी स्त्रीला येशू बरोबर बोलताना तिला उद्धारक भेटला. त्याचबरोबर तिने गावात जाऊन इतरांना सुद्धा तेथे बोलावून आणले तिने स्वतः ख्रिस्ताच्या शिष्यांपेक्षाही प्रभावी कार्य केल्याचा पुरावा दिला. शमरोनामध्ये शिष्यांना कोणीच असे दिसले नाही की ते उत्साही आहेत. भविष्यामध्ये होणाऱ्या महान कार्यामध्येच त्यांचे विचार अडकून पडले होते. ते हे पाह शकले नाही की त्यांच्या समोर पीक तयार आहे. आणि ते गोळा करण्याची वेळ आहे, परंतु ज्या स्त्रीला त्यांनी हीन समजले होते तिनेच सर्व गावकऱ्यांना येशूचे बोलणे ऐकण्यासाठी एकत्र गोळा केले. नुकताच तिला मिळालेला प्रकाश तिने ताबोडतोब आपल्या गावकऱ्यांना देण्यासाठी गेली. - मिनिस्ट्री ऑफ हिलींग. १०२.ChSMar 125.1

    सेव्हथ डे अॅडव्हेंटिस्ट प्रगती करीत आहेत. त्यांचे आकडे दुप्पट करीत आहेत. संस्था वाढवित आहेत व सत्याचे फलक या अंधाऱ्या जगामध्ये सर्वत्र लावीत आहेत आणि तरीही देवाचे हे कार्य अति धीम्या गतीने चालले आहे. का ? कारण मंडळीचे सभासद वैयक्तिकपणे उठून देवाचे कार्य करीत नाहीत. देवाच्या कार्याची प्रत्येक फांदी लंगडी पडली आहे. त्यामध्ये कृपेचा व दयेचा सुगंध नाही. त्यांच्यामध्ये आता नम्रता ही नाही. देवाला भिऊन कार्य करणारे कार्यकर्तेही नाहीत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शिपाई आता कोठे आहेत ? देवाला भिऊन वागणारे, नम्र आणि दयाळू कामगारांची अति गरज आहे. जे देवाचे कार्य आनंदाने व समाधानाने करतील. आनंदाने देवाचे गौरव करतील. ते स्वतः देवाच्या विरोधात असणाऱ्यांना विरोध करतील. अनेक जणांची हृदये गर्दीतील गोंधळामध्ये हरविली आहेत. ते सैतानाच्या मोहामध्ये बेशुद्ध झाले आहेत. आध्यात्मिक गोंधळामुळे हरवून गेले आहेत. सत्य असत्याची खिचडी झाली आहे, परंतु अशी वेळ येईल की अशक्त सशक्त बनतील आणि ख्रिस्त विरोधक सैतानी लोकांना शूर शिपाई बनून त्यांना जिंकतात. - हिस्टॉरिकल स्केचेस. २९०. ChSMar 125.2

    प्रत्येक ख्रिस्ती सेवकाला वाटते की त्याच्यावर सोपविलेल्या भाविकांची आध्यात्मिक उन्नति व्हावी आणि ते देवाचे सहकारी कामगार बनावे. देवाचे कार्य तडीस नेण्याची कृती बहुतांशी मंडळीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. ह्याची जाणीव त्याला होती. - द अॅक्टस ऑफ द अपोस्टल. २०६.ChSMar 125.3

    तुमची हाडे आणि स्नायु यांना तुमची धार्मिकता काही उपयोगाची नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यामध्ये रस घेऊन उत्साहाने त्याचे कार्य करीत नाही त्यामध्ये तुमची प्रीति असावी. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:२३६.ChSMar 126.1

    ख्रिस्तासाठी काहीच करीत नाहीत ते आळशी आहेत. ते काम न करता नुसतेच खात राहून जगण्याचा प्रयत्न करतात. याचा परिणाम नैसर्गिक जगात होतो. तसेच आध्यात्मिक जगात होतो, म्हणजे हास व नाश हेच घडून येते. - स्टेप्स टू ख्राईस्ट. ८०, ८१.ChSMar 126.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents