Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आध्यात्मिक अंधार

    मंडळ्यामध्ये सध्या आध्यात्मिक अंधार आहे. पूर्ण जग आध्यात्मिकपणे अंधारात आहे. ईश्वरी गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. म्हणून या लोकांपासून देव आणि सत्य लपून राहिले आहे. दुष्टपणाची शक्ति एकवटून प्रत्येकांवर येत आहे. सैतान लोकांची खोटी स्तुती करीत आहे. अशाप्रकारे खोटे संदेष्ट्यांनी आपले हातपाय पसरले आहेत. याचबरोबर आता मंडळ्यांमध्ये सुस्तपणा आला आहे. सैतान आणि त्याचे हस्तक आळशी लोकांकडून देवाच्या कार्यामध्ये अडथळे आणीत आहेत. ख्रिस्ती लोक ज्यांना बायबलचे ज्ञान आहे ते जगाला ख्रिस्ताची ओळख करुन देत नाहीत. कारण ते स्वत:च भ्रष्ट झाले आहेत. ते स्वार्थी आणि गर्दीष्ट झाले आहेत. त्यांना परिवर्तनाची गरज आहे. असे झाले तर ते इतरांना मार्गदर्शन करुन त्यांची स्वच्छतेची पातळी वाढवून त्यांचा स्तर उंच करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:६५.ChSMar 77.1

    आमच्या दिवसामध्ये जसे देवाचे जुने सत्य महत्त्वाचे आहेत. परंतु मानवाच्या बुद्धीमध्ये बायबची पूर्ण वचनाची स्वीकृती होत नाही पूर्ण बायबल स्फूर्तिदायक आहे, परंतु बायबल तज्ञ पूर्ण बायबलचा स्वीकार करीत नाहीत. एका बायबल तज्ञाने बायबलचा एका भाग नाकारला, दसऱ्याने दुसरा भाग. त्यांना स्वत:चाच न्याय आपल्या श्रेष्ठ शब्दांनी केला आणि ते शास्त्र शिकवितात ते स्वत:च्या अधिकारावर यामुळे ते स्वर्गीय अधिकाराचा नाकार करतात. यामुळे ते चुकीचे अनुमान ते लोकांच्या मनात चुकीचे बी पेरतात. लोकांच्या मनात चुकीचे झाड उगवून त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यांना समजत नाही की कशावर विश्वास ठेवावा ? अनेक विश्वासु आहेत परंतु लोकांकडे सत्याचा विश्वास नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन, ३९.ChSMar 77.2

    आतापर्यंत दुष्टाईने कधीही इतकी मजल मारली नव्हती ती आता उफाळून वर आली आहे. तरीही सुवार्तेचे अनेक सेवक “शांती आहे निर्भय आहे.” असे सांगतात, परंतु देवाच्या निष्ठावंत सेवक त्यांचे कार्य पुढे नेत आहेत आणि तसे पुढे गेले पाहिजे. स्वर्गाचे सर्वांगाची ........ परिधान करुन निर्भयतेने आणि विजयाने त्यांनी पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. आणि सत्यसंदेश त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक व्यक्तला मिळेपर्यंत त्यांनी कार्याला पूर्ण विराम देऊ नये. - अॅक्ट ऑफ द अपोस्टल्स, २२०.ChSMar 78.1

    आज जगाच्या धार्मिक परिस्थितीमुळे धोक्याची घंटी वाजत आहे. देवाची कृपा क्षुल्लक मानली जात आहे. अनेक जण यहोवाचे नियम निरर्थक बनवित आहेत. ते लोकांना मनुष्याचे नियम शिकवितात. देवाच्या आज्ञाऐवजी मनुष्याच्या आज्ञा पालन करण्यासाठी सांगतात. जगाच्या या भूमीवर उघडपणे देवाच्या नियमांविरुद्ध अत्याचार करीत नाहीत, परंतु बायबलमधील काही नियम पायदळी तुडवितात आणि ख्रिस्तीपणाचा पोशाख वरुन चढवितात. देवाकडून आलेल्या बायबलमधील प्रकटीकरणाला ते सुरुंग लावतात. म्हणजे बायबलवरील विश्वास सोडून देतात. ईश्वर भक्तिच्या महा धर्मनिष्ठेला पारंपारिकतेचा पोकळ पोशाख चढवितात. परिणामी स्वधर्म त्याग, कामुकता आणि मनमानीपणाचा वरचष्मा होतो. अत्याचार घडतात. तेव्हा ख्रिस्त जाहीर करतो. “लोटाच्या दिवसात जसे होते तसे होईल.” त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्राच्या प्रगट होण्याच्या वेळीही मानवाची तीच अवस्था असेल. रोजच्या घडणाऱ्या घटनांची नोंद ही प्रत्येकाच्या शब्दांची चाचणी घेण्यात येईल आणि देवाचे वचन पूर्ण होईल हे जग आता पूर्णपणे कापणीसाठी तयार होत आहे. नाशाकडे जगाची वाटचाल झपाट्याने होत आहे. लवकरच देवाचा न्याय जगावर येणार आहे. तेव्हा पाप आणि पाप्यांचा नाश होईल. - पॅट्रि. आर्च अॅण्ड प्रॉफेटस्. १६६.ChSMar 78.2