Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १७: ख्रिस्ती लोकांचे मदत कार्य

    ईश्वरी पाऊल खूणांची नक्कल करणे

    या पृथ्वीवर ख्रिस्ताने आपले जीवन घालविले त्या ठिकाणी भेटी देणे जेथे तो चालला तेथे चालणे ज्या सरोवराच्या किनाऱ्यावर त्याने शिकविले त्याचे दर्शन घेणे आणि ज्या डोंगर दऱ्यावर त्याची दृष्टी खिळली होती ते पाहणे याचे भाग्य मोठे आहे असे अनेकांना वाटते, परंतु ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला नासरेथ, कपर्णहूम आणि बेथानीला जाण्याची गरज नाही. त्याच्या पाऊलखूणा आम्हाला आजाऱ्यांच्या खाटे शेजारी, गरीबांच्या झोपडीत, शहरातील गर्दीच्या गल्लीबोळात आणि जेथे जेथे मानवी अंत:करणाला समाधानाची, सांत्वनाची गरज आहे तेथे तेथे दिसतील. पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने जे जे केले ते केल्याने आम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालू शकतो. - द डिझायर ऑफ एजेस ६४०. ChSMar 218.1

    क्लेशाने व्यथित झालेल्या प्रत्येक व्यक्तिचा येशूने दुःख परिहार केला त्यांना देण्यासाठी त्याच्याजवळ अति अल्प पैसे होते, परंतु स्वत:चे भोजन देऊन त्याने गरजवंतांची नड भागविली. त्याचे वजन त्याच्या भावाविरुद्ध आहे असे त्याच्या भावांना वाटले त्याच्या ठायी असलेले कौशल्य त्यांच्यापैकी एका जवळही नव्हते. गरीबांना खडसावून बोलून त्यांची मानहानी ते जेव्हा करीत असत त्याचवेळी ख्रिस्त त्यांना उत्तेजनार्थक शब्द बोलत असे गरजवंतांना थंड पाण्याचा ग्लास देऊन त्यांच्या हातात तो स्वत:चे जेवण देत असे. त्यांचे दुख परिहार करीत असताना जे सत्य त्यांना शिकविले ते त्यांच्या स्मरणात पक्के राहिले. कारण ती करुणेची कृती होती. - द डिझायर ऑफ एजेस ८६, ८७.ChSMar 218.2

    येशूने ज्या पद्धतीने कार्य केले त्याच पद्धतीने त्याच्या अनुयायांनी केले पाहिजे. आपण भुके कंगाल लोकांना अन्न दिले पाहिजे. उघड्या नागड्यांना वस्त्रे दिली पाहिजेत आणि दुखी व पीडित लोकांचे सांत्वन केले पाहिजे. त्याचप्रमाणे निराश झालेल्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे. त्याचप्रमाणे निराश झालेल्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे आणि हताश झालेल्यांना हर्षित केले पाहिजे असे केल्यामुळे आपल्या विषयी केलेले “तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल.” — द डिझायर ऑफ एजेस ३५०.ChSMar 218.3

    जे कोणी ख्रिस्तास मदत कार्यात गुंतलेले आहेत देवाच्या ज्या इच्छा आहेत त्यांनी त्या केल्या आहेत आणि त्याने त्यांचे कार्य स्वीकारले आहे. ते काम त्यांनी एका रांगेत केले जे प्रत्येक सेव्हथ डे अॅडव्हेंटिस्ट व्यक्तिने मन:पूर्वक आणि नम्रपणे कार्य करावे. तेही सोयीस्कर ठिकाणी आणि आपली चिकाटी सोड नये. जे आपल्या सीमेच्या आतमधील लोकांमध्ये काम करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे ओझे पेलण्यास त्यांनी नाकारले. मंडळीमध्ये फार मोठे नुकसान होत आहे. मंडळीने हे कार्य हाती घेतले आहे काय ? त्यांनी हे कार्य हाती घ्यावी. या प्रकारे ते अनेक आत्मे देवाच्या राज्यात घेऊन येतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९५.ChSMar 219.1

    जे ख्रिस्ताच्या कार्यामध्ये सहाय्य करण्यात गुंतले आहेत. ते देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे ते करतात. आणि देवाने त्यांचे काम स्वीकारले. हे कार्य असे करायला हवे की सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्टच्या परंपरेप्रमाणे करायला हवे. कुटुंबामध्ये जो विश्वास आहे तोच विश्वास व तीच परंपरा त्यांच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये असणे आवश्यक आहे. ज्यांनी त्यांच्या सीमेच्या आतील सुवार्तेकडे दुर्लक्ष केले असेल तर प्रथम त्याची दुरुस्ती करावी. तुम्हाला हे ओझे वाटत असेल तर मंडळीचे अतोनात नुकसान होईल. मंडळीने हे कार्य आपल्या शरीरावर घेतले होते आणि आतापर्यंत मंडळीने अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणले असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९५.ChSMar 219.2

    परमेश्वराने जी देणगी दिली तिचा उपयोग मानवांना आशीर्वाद मिळावायासाठी वापरावी, जे गरजू असतील त्यांच्या गरजा भागवून त्यांना सहाय्य करावे. जे भूकेले असतील त्यांना खावयास द्यावे, उघडे असतील त्यांना वस्त्र द्यावे. अनाथांना वस्त्रे द्यावीत, जे निराश व हताश झाले असतील त्यांची काळजी घ्यावी. या जगात अशाप्रकारे दुःख व निराशा पसरावी अशी परमेश्वराची इच्छा नाही. एका मनुष्याने जिवनाच्या सर्व सुखसोयीचा उपभोग घेतला तर दुसऱ्या मनुष्याने भाकरीसाठी भिकेची आरोळी मारणे अशी परमेश्वराची योजना नाही. प्रत्येक मनुष्याची गरज भागली म्हणजे त्यानंतर जे काही शेष राहते त्याचा उपयोग इतर मनुष्यांना मदत व आशीर्वाद अशा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करणे. प्रभु म्हणतो, “जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा.” लूक १२:१३.” चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील व परोपकारी असावे. “१ मिथ्य ६:१८.” तर तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांस आमंत्रण कर.” लूक १४:३३. दुष्टतेच्या बेड्या तो डाव्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे. सगळे जोखंड मोडावे. तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे. तू लाचारास व निराश्रीतास आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लापवू नये. दुखग्रस्त लोकांस तृप्त करावे. यशया ५८:६,७,१०. “सर्व जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तची घोषण करा.” मार्क १६:१५. याप्रभूच्या आज्ञा आहेत. महान ख्रिस्ती मंडळीने हे कार्य करावे. म्हणून प्रभूच्या आज्ञा पाळाव्यात काय ? - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३७०, ३७१.ChSMar 219.3

    चांगल्या कृत्याची फळे मिळविणे ही ख्रिस्ताची गरज आहे. उपकारकारक बुद्धी दयेचे शब्द आणि गरीबांसाठी दयेचे शब्द. गरजवंतांना सहाय्य. जेव्हा एखाद्याच्या हृदयामध्ये दुःख असेल आणि त्याच्याविषयी ज्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या विषयी दया असेल तर निराशेने ओझे असणारांचे दुःख निवारण होते. जेव्हा आपले हात गरजवंतांना सहाय्य करण्यासाठी पुढे सरसावतात गरीबांना कपडे देण्यात येतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिचे आपल्या घरात स्वागत करतो व तसे हृदयामध्ये ठरवितो यावेळी देवदत अति जवळ येतात आणि त्यांच्या प्रत्युतराची बातमी स्वर्गात देतात. अशा हृदयांचा न्यायीपणा, दया आणि उपकारक बुद्धी यामुळे स्वर्गात मधूर संगीतांनी आनंद व्यक्त होतो. स्वर्गातून पिता आपल्या आसनावरुन दयापूर्ण हृदयाकडे अवलोकन करतो व त्यांच्या दयापूर्ण कृतीकडे आपल्या खजिन्यातून आशीर्वादाची ओतणी करतो. “आणि ते माझे लोक होतील’ असे पिता परमेश्वर म्हणतो. त्या दिवशी मी जेव्हा माझे दागिने बनवितो. तेव्हा गरजवंताकडे जे दयेने पाहतात ते माझे अनमोल हीरे आहेत हे माझ्या दागिन्यातील हीरे होते. जे गरजवंतांना असे सहाय्य करतात ते ख्रिस्तालाच करतात. जेव्हा तुम्ही अडचणीत असणाऱ्यांना सहाय्य करता. दया दाखविता, गरीबांना मदत करता. ज्यांचे ......... झालेले असते व जे अनाथ असतात त्यांचे मित्र होतात तेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा जवळचा संबंध ठेवता. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:२५.ChSMar 220.1

    ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, जे गरजवंत आहेत. गरीब आहेत अशांसाठी कार्य करण्यामध्ये जे गुंतले आहेत असे लोक सर्व मंडळ्यात असावेत. प्रत्येक सभासद आणि सत्य असणाऱ्यांनी अशा लोकांशी मैत्री करावी असे केल्याने येशूशी जवळची मैत्री होते. चांगल्या शमरोनाची दया आपल्याला ठाऊक आहे. रस्त्याकडेला पडलेल्या जखमीला त्याने दया दाखवून त्याच्या जखमांवर मलम पट्टी केली. भुकेल्यांना खाऊ घालणे. गरीब व टाकून दिलेल्यांना घरी आणून त्यांची काळजी घेणे. रोज देवाकडून कृपा आणि सामर्थ्य मिळवून मानवतेच्या खोल दयेसाठी वापर करावा आणि जे स्वत:चे सहाय्य करु शकत नाही. त्यांना सहाय्य करावे. असे करुन आपण ख्रिस्त जो वधस्तंभावर खिलीला होता त्याच्या दयेच्या वतीने हे कार्य करावे. - टेस्टिमोनिज फार द चर्च ६:२७६.ChSMar 220.2

    अनेकांना नवल वाटते की त्यांच्या प्रार्थना निर्जिव का असतात ? त्यांचा विश्वास डळमळीत का असतो ? त्यांच्या ख्रिस्तीपणाचा अनुभव अंधारात व अनिश्चित का असतो “आम्ही उपास करितो ते तू का पाहत नाहीत ? ते म्हणतात आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणीत नाहीस? यशयाच्या अठ्ठावणाव्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने हे दाखवून दिले आहे. ही परिस्थिती कशी बदलेल. वचने ६,७. दुर्बल अंधुक हृदयाच्या आणि थरथरच्या संशयी आत्म्यासाठी ही वचने दिली आहेत. जे शोकपूर्वक देवासमोर येतात त्यांना जाऊन सहाय्य करणे देवाच्या लोकांचे कर्तव्य आहे. - टेस्टिमोनिज फार द चर्च ६:२६६.ChSMar 221.1

    जे पतन पावलेले व त्रस्त झालेले त्यांचे समाधान करणे व त्यांचा उध्दार करणे यात स्वर्गाचे गौरव आहे. ज्या ज्या मानवाच्या ठायी ख्रिस्त असेल. ते ते लोक ख्रिस्ताला प्रदर्शित करतील. जे लोक जेथे कोठे कार्य करतील तेथे ख्रिस्ताचा धर्म आशीर्वाद देईल. जेथे कोठे तो धर्म कार्य करील तेथे तो प्रकाशित होईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३८६.ChSMar 221.2

    सारफथच्या विधवेने आपल्या भाकरीचा तुकडा एलिया बरोबर वाटून खाल्ला आणि त्याच्या मोबदल्यात तिचा जीव आणि तिच्या मुलाचा जीव वाचविण्यात आला. अडचणीच्या आणि कसोटीच्या वेळेस दुसऱ्यावर सहानुभूति दाखवून सहाय्यचा हात पुढे करतात. त्यांना मोठ्या कृपा प्रसादाने देवाने अभिवचन दिले आहे. तो बदललेला नाही किंवा त्याच्यात बदल झालानाही. आजसुद्धा त्याचे सामर्थ्य एलियाच्या दिवसासारखेच आहे. उद्धाराचे अभिवचन त्यावेळेप्रमाणे आजही खात्रीदायक आहे. “संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे फळ मिळेल.’ मत्तय १०:४१. - प्रॉफेटस् अॅण्ड किंग्ज १३१,१३२.ChSMar 221.3

    ख्रिस्ताच्या नि:स्वार्थी प्रेमाचे प्रदर्शन हे दुष्टतेच्या सवयांना सुधारण्यासाठी भीति उत्पन्न करणे आवश्यक आहे. परंतु प्रेमाचा मिशनरी यापेक्षाही अधिक काही करील. जे हृदय निंदा करण्याने कठोर बनते ते ख्रिस्ताच्या प्रेमाने पाघळेल. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०६.ChSMar 222.1