Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  अध्याय १ : सेवेसाठी देवाचे पाचारण

  मानवी प्रतिनिधीवर अवलंब

  मनुष्यामध्ये त्याचे प्रतिनिधी म्हणून देवान आपल्या पतन न पावलेल्या देवदूतांची कधीच नेमणूक केली नाही, परंतु मानवाची. जे लोक स्वतः तारण करण्यासाठी मार्ग शोधतात. ख्रिस्ताने मानवापर्यंत पोहोचण्यासाठी मानवाचा जन्म घेतला. या स्वर्गीय मनुष्याला जगातील मानवाचे तारण करायचे होते. या स्वर्गीय मनुष्याला जगातील मानवाचे तारण करायचे होते. स्त्री-पुरुषांना पवित्र सत्य विश्वास त्यांना कळवायचा आहे. “ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता सादर करण्याची जबाबदारी देवाने स्त्री-पुरुषावर सोपविली आहे.” - प्रेषितांची कृत्ये १३४.ChSMar 14.1

  हृदयस्पर्शी दृश्य पाहा. स्वर्गीय राजा व त्याच्या भोवती असलेले निवडक बाराजण यांच्याकडे पाहा विशिष्ट कार्यासाठी तो त्यांची नेमणूक करण्याच्या तयारीत आहे. या दुर्बल साधनांच्याद्वारे आणि त्याचे वचन व आत्मा यांच्या सामर्थ्याद्वारे तारण सर्वांच्या आवाक्यात ठेवण्याची त्याची योजना आहे.” प्रेषितांची कृत्ये १८.ChSMar 14.2

  “यापोस माणसे पाठीव आणि शिमोना नावाच्या बोलावून आण सुवार्ता कार्य व त्याची प्रस्थापित मंडळी यांच्या विषयी असलेल्या त्याच्या आदराचा पुरावा देवाने अशाप्रकारे दिला. वधस्तंभाची कथा कथन करण्यास दूताला आदेश देण्यात आला नव्हता. नैतिक दुर्बलतेला व मोहाला बळी पडू शकणाऱ्या कर्नेल्या सारख्याच मनुव्यावर वधस्तंभावर खिळलेल्या व पुनसत्थित झालेल्या उद्धारकाविषयी प्रबोधन करण्याची जबाबदारी देवाने टाकली होती.” प्रेषितांची कृत्ये १३४.ChSMar 14.3

  देवदूताने फिलिपाला पाठविले तो स्वत: हबशी षंढाला मदत करण्यासाठी गेला असता, परंतु हे कार्य करण्याचा देवाचा मार्ग नाही, परंतु देवाची योजनाही माणसानेच माणसाला सहाय्य करावे. प्रेषितांची कृत्ये. १०९ChSMar 14.4

  प्रेषित पुढे म्हणाला. ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे. अशा हेतुने की सामर्थ्याची पराकोटी आमच्या देवाची आहे. आमच्यापासून होत नाही हे समजावे. देव त्याचे सत्य देवदूतांच्या द्वारे घोषित करु शकला असता, परंतु तसा त्याचा संकल्प नव्हता. त्याची योजना कार्यरत होण्यासाठी तो दुर्बलतेने वेढलेल्या मानव प्राण्याचा उपयोग करु घेतो. ही अम्पेल संपत्ति मातीच्या भांड्यात ठेवली आहे. मनुष्याच्या द्वारे त्याचे आशीर्वाद जगापुढे वाहून नेण्यात येतात. त्यांच्याद्वारे त्याचे गौरव पापाच्या अंधारात प्रकाशणार आहे. पापी व गरजू लोकांना प्रेमळ सेवेद्वारे ते वधस्तंभाकडे जाण्यास प्रवृत्त करतील. त्यांच्या सर्व सेवाकार्यामध्ये जो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे व सर्वांवर अधिपत्य गाजवितो त्याला त्यांनी गौरव सन्मान आणि स्तुति द्यावयाची आहे.” प्रेषितांची कृत्ये ३३०.ChSMar 14.5

  तो तारणाऱ्याचा हेतु होता की तो स्वर्गात गेल्यानंतर मनुष्यासाठी रद बदली करणार होता. त्याने सुरु केलेले कार्य त्याचे अनुयायी पुढे चालू ठेवतील. जे लोक अंधारात आहेत त्यांना मानवाचे प्रतिनिधी सुवार्ता संदेश देण्याचे कार्य करणार नाहीत. काहीजण स्वेच्छेने जगाच्या कोपऱ्यापर्यंत सुवार्ता संदेशाचा प्रकाश घेऊन जातील. परंतु ज्या सर्वांना सत्य ठाऊक आहे त्या सर्वांनी सत्याचा प्रकाश लोकांकडे घेऊन जावे अशी देवाची इच्छा आहे. जर आम्ही देवाचे सत्य ज्यांना ठाऊक नाही आणि जे शिक्षेसाठी तयार आहेत त्यांना सत्य प्रकाश देण्यासाठी आणि आत्मे जिंकण्यासाठी स्वत:चे विशेष समर्पण करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर आपण देवाच्या शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी लायक कसे ठरु ? मंडळीसाठी साक्ष ९:१०३.ChSMar 15.1

  सत्यशोधकांना प्रभु परमेश्वर सत्याचे ज्ञान असणाऱ्या बांधवांच्या संबंधात आणीत असतो. अंधारात चाचपडत असणाऱ्यांना प्रकाशधारकांनी प्रकाश द्यावा ही दैवी संकल्पना आहे. मानवता देवी ज्ञानसागरातून आपली कार्यक्षमता खेचून घेते आणि ती साधन व कार्यकारी प्रतिनिधी बनून तिच्याद्वारे मन व अंत:करण यांच्यावर सुवार्तेची परिवर्तन शक्ति प्रचंड प्रभाव पाडते. प्रेषितांची कृत्ये १३४.ChSMar 15.2

  आमच्या सहाय्याशिवाय मानवाचा उद्धार करण्याचा आपला उद्देश देवाने साध्य करुन घेतला असता, परंतु ख्रिस्तासारखा आमचा विश्वास बनण्यास आम्ही त्याच्या कार्यात सहभागी व्हायला पाहिजे. त्याच्या उद्धार कार्यात भाग घेतला पाहिजे. त्याच्या यज्ञबलीद्वारे उद्धारे पावलेल्यांना पाहाणे हा त्याचा आनंद होता. युगानुयुगाची आशा. १२३ChSMar 15.3

  लोकांमध्ये त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ख्रिस्ताने अपतित दिव्यदूतांची निवड केली नाही, परंतु मानवाची निवड केली कारण सारख्याच विचारांच्या आणि भावनेच्या लोकांमध्ये हे उद्धाराचे काम करणार होते. मानवतेचा संबंध साधण्यासाठी ख्रिस्ताने मानवता परिधान केली. देवत्वाला मानवतेची आवश्यकता होती. कारण जगात मुक्ती, तारण आणण्यासाठी देव व मानव या दोहोंची जरुरी होती. देव व मानव यांच्यामधील संधान — दुवा साधण्यासाठी देवत्वाला मानवतेची गरज होती - युगानुयुगाची आशा २९६.ChSMar 15.4

  जगासमोर येशूला सादर करण्यासाठी आम्ही दिव्य दूतांबरोबर सह कामगार म्हणून काम केले पाहिजे. देवदूत आमच्या सहकार्याची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण मनुष्याने मनुष्याशी दळणवळण केले पाहिजे. जेव्हा आम्ही मनापासून भक्तिभावाने ख्रिस्ताला वाहून देतो तेव्हा दूत उल्हासीत होतात कारण आमच्या वाणीद्वारे ते देवाचे प्रेम प्रगट करु शकतात. युगानुयुगांची आशा २९७. ChSMar 16.1

  आम्ही देवाबरोबर एकत्रितपणे काम केले पाहिजे. कारण मनुष्याच्या सहकार्याशिवाय देव आपले कार्य पूर्ण करु शकत नाही. रीव्हिव ऑफ हेरॉल्ड. मार्च १८८७.ChSMar 16.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents