Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  दाखले लागू करणे

  देवाच्या महान प्रीतिची दोन मुख्य तत्त्वे आहेत ते म्हणजे देवाची उच्च कोटीतील प्रीति आणि मानवावरील नि:स्वार्थी प्रीति. शेजाऱ्यावरील प्रीति. पहिल्या चार आज्ञा आणि शेवटच्या सहा आज्ञा यावरील दोन तत्त्वांवरच अवलंबून आहेत. आपला शेजारी कोण हे ख्रिस्ताने सविस्तरपणे सांगितले आहे. एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोस प्रवास करीत होता तेव्हा लूटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून मारहाण करुन अर्धमेला तेथेच टाकून निघून गेला. एक याजक आणि लेवीने त्याला जखमी अवस्थेत पाहिले, परंतु त्याची तातडीची गरज त्यांच्या हृदयापर्यंत पोहचली नाही. म्हणून ते त्याला टाकून दुसऱ्या बाजूने निघून गेले. त्याच वाटेने एक शोमरोनी आला आणि त्याने पाहिले की एक अनोळखी मनुष्य जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला कण्हत पडला आहे. त्याने त्याला एकही प्रश्न न विचारता ताबडतोब त्याच्या मदतीला गेला. तो कोण कोठला, कोणत्या देशाचा, गावाचा असे त्याने काहीच विचारले नाही. त्याने त्याची सेवा केली कारण तीच त्याची प्राथमिक गरज होती. त्याच्या जखमा बांधल्या व आपल्या जनावरांवर बसवून त्याला उतार शाळेत आणले आणि स्वत:च्या खर्चाने त्याची काळजी घेण्यास सांगितले.ChSMar 225.3

  या शोमरोन्याला ख्रिस्ताने त्या जखमी मनुष्याचा शेजारी असल्याचे सांगितले. याजक आणि लेवी हे दोघे मंडळीतील सभासद जे स्पष्टपणे दुर्लक्ष करीत होते. जखमीला सहाय्याची गरज असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हा वर्ग मंडळीमध्ये त्यांच्या पदावर उभे राहण्यास लायक नाहीत. अशा प्रकारच्या कृत्याने त्यांना देवाच्या आज्ञा भंग केला होता. शोमरोनी हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा सहाय्यक होता. चांगले कार्य करुन त्याने ख्रिस्ताचे उदाहरण दिले होते.ChSMar 226.1

  त्या दुर्दैवी व्यक्तिला दया करुन शोमरोनीने ख्रिस्ताचे उदाहरण दिले होते. आंधळे, पांगळे, विधवा, अनाथ आणि गरजवंत हे सर्व दुर्दैवी आत्मे आहेत. ख्रिस्त हा आज्ञापालन करणारा प्रतिनिधी आहे. त्याला सार्वकालिक जीवन आहे. ख्रिस्ताची इच्छा आहे की सर्वांना दयायुक्त जीवन जगावे. परोपकार प्रवृत्ति आणि विचारपूर्वक दुर्दैवी लोकांशी वागावे. जे दुर्दैवी आत्मे अंध, पांगळे, आजारी, विधवा आणि अनाथ या सर्वांची स्वत:सारखी काळजी घ्यावी. या सर्व चांगल्या गोष्टींचा संग्रह स्वर्गामध्ये कराव्यात म्हणजे त्यांना त्याचे पारितोषिक मिळेल. दुसऱ्या बाजूने याजक आणि लेवीग हे त्या असाह्य दुर्दैवी जखमी व्यक्तिशी जसे वागले त्याची त्यांना शिक्षा मिळण्याची नोंदही झाली असेल. ज्यांनी एखाद्यावर अन्याय केला असेल त्यांनाही त्यांच्या कृत्यांची फळे भोगावी लागतील. या पुस्तकातील पीडा त्यांना भोगाव्या लागतील. अन्याय केला असेल त्यांनाही त्यांच्या कृत्यांची फळे भोगावी लागतील. या पुस्तकातील पीडा त्यांना भोगाव्या लागतील. अन्यायाच्या प्रत्येक कृत्याची झाडाझडती देव घेईल. प्रत्येक निष्काळजीपणाची त्यांना शिक्षा होईल. शेवटी प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कृत्याचे फळ प्रत्येकाला नक्कीच मिळेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ३:५११-५१३.ChSMar 226.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents