Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    स्व संतुष्ट वर्ग

    माझ्या समोर आणखी एक वर्ग दाखविण्यात आला की त्यांना अधिकार असल्याची जाणीव आहे. ते उत्साहाने देवाचे कार्य करु शकतात, असो. त्यांना विश्वास वाटतो. ते भक्तिभावाने देवाचे कार्य करु इच्छितात, परंतु करीत मात्र काहीच नाही. ते स्वतः मध्येच संतुष्ट असल्याची भावना त्यांना होत असते. ते स्वत:चीच स्तुति करतात की त्यांना जर संधी मिळाली तर किंवा तशी परिस्थिती त्यांच्या मनाप्रमाणे होईल तर ते देवाच्या कार्याला हात लावतील व ते मोठे व चांगले कार्य करतील, परंतु ते संधी मिळण्याची वाट पाहतात. गरीब लोकांचा ते तिरस्कार करतात. त्यांना मदत करण्यामध्ये ते कंजुषि करतात त्यांना ते क्षुद्र समजतात. गरजवंताना मदत करीत नाहीत. ते स्वत:साठीच जगतात हे पाहतात. इतरांसाठी ते काहीच चांगले करु शकत नाहीत. तो इतरांचे चांगले करण्यास स्वत:ला सांगू शकत नाही. इतरांना आशीर्वाद देऊ शकत नाही. त्यांच्याकडे जी कला आहे ती इतरांना फज्ञयद्याची होत नाही. देवाने दिलेल्या देणग्या इतरांसाठी उपयोगाच्या आहेत. त्या स्वत:कडेच न ठेवता त्यांचा वापर करावा. त्यांचा दुरुपयोग करु नये. या सर्व देणग्या देवाने इतरांना आशीर्वादासाठी देण्यासाठी आहेत. स्वत:साठी नाहीत किंवा वापरुच नये यासाठी नाहीत. असे जर केले तर त्या देणग्या किंवा जमिनीत पुरुन ठेऊ नका तर त्यांचा वापर करा. तुमच्या देणग्यांना गंज लागू देऊ नका. तर स्वार्थ सोडा. उदार व्हा आणि मुक्तपणे आपल्या देणग्यांना मार्ग मोकळा द्या. कारण तुम्हाला तुमच्या देणग्यांचा हिशोब द्यायचा आहे. संधी शोधण्याची वाट पाहू नका तर स्वत:ची जबाबदारी ओळखा व उठा व कामाला लागा. जे संधीची वाट पाहतात त्यांना ती मिळणार नाही. तरीही तयारी करण्यासाठी आतून ते विरोधच करतील कारण त्यांना उत्साह नसेल. देवाच्या कार्यासाठी जाण्यास ते कंजुषि करतीलच. अशाप्रकारे ते स्वत:ची फसवणूक करीत आहेत. केवळ दर्जेदारपणाचा हक्क उपयोगाचा नाही किंवा जबाबदारी घेऊन उपयोग नाही तर जबाबदारीची जाणीव होऊन गुरुजीने दिलेल्या दानाच्या संचयाचा वापर करावा. असे जर झाले नाही तर तुमचे शेजारी ही त्यांच्या आत्म्यातून तिरस्कार करतील. त्यांना असे म्हटले जाईल की “तुम्हाला तुमच्या धन्याची इच्छा ठाऊक आहेत तरीही तुम्ही ओळखत नाही.’ - टेस्टिमोनिज फॉर द चर्च . २:२५०, २५१.ChSMar 54.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents