Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ईश्वरी कार्य

    ख्रिस्ताच्या शिष्यांनी जे कार्य केले, आम्ही सुद्धा ते करावे. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य मिशनरी आहे. सहानुभूती आणि दया. घेऊन ज्यांना यांची गरज आहे त्यांच्याकडे जाऊन सहाय्य करा. नि:स्वार्थीपणाने जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना ईश्वरी प्रकाशाने सहाय्य करावे. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०४.ChSMar 32.1

    स्वर्गरोहण करण्याआधी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना ही महान सनद दिली. ज्या इच्छेमध्ये त्याने अनंतकालीन जीवनाचा संग्रह जगासाठी ठेवला आहे ती इच्छा अंमलात आणण्याचे जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे असे त्याने सांगितले. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल, २७. ChSMar 32.2

    पहिल्या प्रथम शिष्यांना दिलेल्या ठेवीत प्रत्येक युगातील शिक्षकांनी सहभागी झाले पाहिजे. ज्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला आहे त्या प्रत्येकाला जगाला देण्यासाठी पवित्र सत्य प्रदान करण्यात आले आहे. देवाचे निष्ठावंत लोक नेहमीच आवेशी, उत्साही मिशनरी असतात. त्याच्या नामासाठी स्वत:चा साधनसाठा अर्पण करुन त्याच्या सेवेत त्यांचे कौशल्य ते सुज्ञपणाने वापरतात. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १०९.ChSMar 32.3

    सुवार्ता आयोग हा ख्रिस्त राज्याची महान सनद आहे. सर्वांना करुणामय पाचारण देण्याचे काम शिष्यांनी मनापासून करायचे होते. लोकांनी त्यांच्याकडे येण्यासाठी त्यांना वाट पाहात बसायचे नव्हते. परंतु त्यांच्याकडे संदेश घेऊन त्यांना जावयाचे होते. - अॅक्टस ऑफ अपोस्टल, २८.ChSMar 32.4

    देवाच्या संदेष्ट्यांनी देवाच्या सुवार्तेचे कार्य स्वीकारले तसे येशूने जगामध्ये असताना येणाऱ्या राज्याची सुवार्ता गाजविल. त्यांनी स्वतः जाऊन सुवार्ता प्रसार करावा जो ख्रिस्ताने केला तो त्याच्या सुवार्तेची प्रत्येक ओळ त्यांनी जगाला सांगावी. प्रामाणिकपणे आणि विश्वासाने त्यांना स्वर्गातील प्रीतिचा दयेचा खजिना जगातील मनुष्याला सांगायला हवा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१३०.ChSMar 32.5

    शिष्यांनी जे कार्य सोपवून दिले हाते ते आज ही देवाच्या प्रत्येक मुलाला दिले आहे. आज मी ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला तो जिवंत झाला आणि ज्यांना देव नाही त्यांच्या समोर त्याला उचलले गेले. जगामध्ये त्यांना एक आशा देण्यात आली आहे. देवाने यासाठी पाळक, शिक्षक, सुवार्ता प्रसारक या सर्वांना पाचारण केले आहे. त्याचे हे सेवक दारोदारी जाऊन देवाच्या तारणाचा संदेश देत असतात. प्रत्येक राष्ट्रभाषा राज्य व लोक या सर्वांना त्यांच्या पापांची क्षमा करण्यासाठी ख्रिस्ताने क्षमा केलेल्याचा संदेश त्यांना कळविण्यासाठी हे देवाचे संदेशवाहक जातात. देवाचे संदेश देण्यासाठी आता वेळ नाही. आता जो संदेश त्यांना द्यायचा आहे तो निर्जिव नाही किंवा लेचापेचा नाही, परंतु स्पष्ट न डगमगता व मोठ्या शब्दात व उत्तेजित. शेकडो लोक आपले जीव वाचविण्यासाठी इशारा मिळण्याची वाट पाहात आहेत. जगाला ख्रिस्ती लोकांच्या ख्रिस्तीपणाच्या सामर्थ्याचा पुरावा पाहण्याची गरज आहे. केवळ काही ठिकाणीच नाही, परंतु संपूर्ण जगामध्ये देवाच्या दयेचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे. दयेचा संदेशाची जगाला गरज आहे. - गॉस्पल वर्कर्स २९.ChSMar 32.6

    येशूचे स्वर्गारोहण होत असताना त्याने आपले काय ज्यांना संदेशाचा प्रकाश मिळाला आहे त्यांच्यावर हे कार्य सोपविले आहे. त्यांना हे कार्य पुढे चालवावयाचे आहे आणि पूर्ण करायचे आहे. त्याने हे कार्य इतर कोणावरही सोपविले नाही. “तुम्ही सर्व जगामध्ये जा आणि प्रत्येक प्राणीमात्राला राज्याची ही सुवार्ता सर्व प्राणीमात्राला सांगा’ हे सत्य त्याने त्याच्या शिष्यांना संगायला लावले आणि पाही मी तुम्हाबरोबर सर्व काळ आहे. एवढेच नाही तर जगाच्या शेवटापर्यंत तुम्हाबरोबर आहे. मतय ८:१९,२०. तारणाची सुवार्ता जगाला सांगण्यासाठी त्यांनी स्वत:चे समर्पण केले. स्वर्गाची पूर्णता हे तुमचे सामर्थ्य आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२०,२१.ChSMar 33.1