Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मिशनरी रुपात महिला

    महिला आणि पुरुष दोघांनी देवाच्या लपलेल्या सत्यावर कार्य करुन लपलेले सत्य स्पष्ट करावे. आणिबाणी किंवा संकट काळामध्ये त्यांना या कार्यात भाग घेऊन इतरांची जागा स्वतः घ्यावी आणि त्या करवी देव आपले कार्य करील. जर ते त्यांच्या कर्तव्यामध्ये बुडून जातात आणि देवाच्या आत्म्यामध्ये उत्साही होऊन कार्य करु लागले, तर त्यांना स्वत:वर अवलंबून राहावे. यावेळी त्यांना याची गरज असेल. ज्या लोकांना या कार्यासाठी स्वत:चे समपर्ण केले आहे त्यांच्यामधून तारणाऱ्याचे परिवर्तन होईल. ख्रिस्ताची कृपादृष्टी आणि त्याची इच्छा त्यांना अधिक सामर्थ्य देईल. कुटूंबामध्ये ते जे कार्य करतील ते इतर लोक करु शकणार नाहीत. हे कार्य हृदयाच्या आतपर्यंत पोहोचते. ते त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यांच्या कार्याची गरज आहे. सूज्ञ व नम्र स्त्री उत्तम कार्य करु शकते. लोकांना त्यांच्या घरी जाऊन सत्य सांगणे त्याचे स्पष्टीकरण करणे. हे ती सोपे करु शकते आणि तिच्या उत्साह पूर्ण बोलण्याने लोकांचे परिवर्तन होते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च, ९:१२८, १२९.ChSMar 37.1

    ज्या कोणाला देवाचे कार्य करायचे असेल त्या सर्वांना मार्था मारियेचा स्वभाव आत्मसात करावा त्यांच्यामध्ये आत्मियता होती. म्हणजे त्यांच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा असणार आणि कार्य करण्याची प्रामाणिक प्रीति असणार आहे. सत्याची आवड असणार आहे. स्वार्थ आणि स्वार्थपणा त्यांच्यामध्ये मुळीच नसणार. देवाच्या कार्यासाठी दूर्दी असतात. त्यांच्याकडे मृदू व कोमल हृदयाच्या व सत्याशी एकनिष्ठ असतात. जे त्यांच्या कार्याला चिकटून असतात त्यांची तो निवड करतो. हे कामगार इतरांबरोबर प्रार्थना करतात, त्यांना सत्य सांगतात, त्यांच्यातील स्वार्थ काढून टाकण्याचा प्रयत्न करतात व स्वत:च्या वर्तणुकीतून आपली सत्यता दाखवून देतात. ते ख्रिस्ताला मध्य केंद्र बनवितात. आत्मे जिंकण्याचे कार्य या महिला मनापासून करतील. - टेस्टिमानिज फॉर द चर्च ६:११८.ChSMar 37.2

    बहिणी जास्त करुन प्रभावी कार्य करतात त्या कार्यक्षम असतात. त्यामुळे मासिकासाठी त्यांना वर्गणीदार मिळविणे सहज शक्य असते. यामुळे त्या अनेकांकडे सत्य प्रकाश घेऊन जातात. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १० जून १८८०.ChSMar 37.3

    अशा अनेक थोर महिला असतील ज्यांना नैतिक धैर्य असेल. या सत्याचे अनेक बळकट पुरावे घेऊन अनेक आत्मे सत्यामध्ये आणतात. त्या सद्सदविवेकबुद्धीने सत्य स्वीकारतात आणि त्यामध्ये टिकून राहतात. त्यांच्यामध्ये यशस्वी कार्य करण्याची पात्रता असते. आपल्या गुरुसाठी यशस्वी कार्य करण्याची कुवत त्यांच्यामध्ये असते. ख्रिस्ती महिलांना यासाठी पाचारण करण्यात येते. - द रिव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० डिसेंबर १८७८.ChSMar 38.1

    आमच्या बहिणी समाजहितासाठी कार्य करतात, जसे लिखाण करणे, चित्रे काढणे आणि इतरांना सत्याची जाणीव करुन देणे. या विश्वासू महिला आपले स्नेही व शेजारी यांना ज्या पत्रिका व ट्रॅक्स देतील त्यावर ते विश्वास ठेवतील. स्त्री आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहते. अशा स्वभावाची गरज आहे. स्त्री जी विश्वास ठेवते की आम्ही खरेच शेवटच्या जगात जगत आहोत आणि आम्हाला शेवटचा गंभीर इशारा मिळाला आहे. सर्व जगाला संदेश पोहोचला आहे आणि हेच ते आहे ज्यांना देवाने ही जबाबदारी दिली. हे मिशनरी असे असावेत. अशाप्रकारे देवाचे कार्य हे विविध प्रकारे केले जाते. सायन्स ऑफ दे टाईन मासिक द्वारेही देवाचा मेसेज सर्वत्र पोहोचतो. समजूतदार देवाच्या लोकांकरवी. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १९ डिसेंबर १८७८.ChSMar 38.2

    स्त्रीन सेवकाचे कार्य करावे किंवा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी वरच्या अधिकाऱ्यांच्या मान्यतेची वाट पाहावी हे मला मान्य नाही. ऑफिसमध्ये काम करणे, मिशनरी कार्य करणे, शिक्षकाचे काम अशा सर्व क्षेत्रामध्ये स्त्री उत्तम प्रकारे कार्य करीत असते आणि यावेळी सुद्धा ती अति जोमाने कार्य करील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १९ डिसेंबर १८७८.ChSMar 38.3

    जर जेथे विस महिला असतील तर यामधील एक तरी अति काळजीने मिशनचे कार्य करील. आम्ही पाहू की महिलांमुळे अनेकांचे परिवर्तन होईल आणि ते सत्यात येतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २ जानेवारी १८७९.ChSMar 38.4

    ज्या महिला काम करु शकतात त्यांची आता गरज आहे ज्या महिला काम करु शकतात. महिला ज्या स्वत:ला जास्त महत्त्व देत नाहीत, परंतु त्यांची हृदये नम्र व प्रेमळ असतात. नम्र ख्रिस्ता बरोबर कोण कार्य करु शकेल. हे लोक आत्म्याच्या तारणासाठी काम शोधतात. द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. जानेवारी १८७९.ChSMar 38.5

    या महिलांना काम दिले असते तर आज शेकडो बहिणी या कार्यासाठी पुढे सरसावल्या असत्या. त्यांनी आपला पोशाख आणि मुलांची कपडे नीटनेटकी असतील. साधे पण स्वच्छ असतील. सर्व सुशोभीत पणापासून दूर होतो त्या स्वत:ला या कार्यामध्ये समर्पित होतील आणि आपले मिशनरी कार्य मन लाऊन करतील. त्या आपल्या मित्रांना लिहीतील त्यांना ट्रॅक्स पाठवितील या सर्व भगिनी एकत्र असतील त्या चर्चा करतील. मिशनरी कार्याविषयी चर्चा करतील. त्या प्रत्येकजणी आपण देवाची मुले असल्याचा दावा करतील आणि खरोखर त्या जबाबदारीने आपले मिशनरी कार्य करतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १२ डिसेंबर १८७८.ChSMar 38.6

    आपल्या काही भगिनी काही जबाबदाऱ्या उचलण्यासाठी काही सबबी सांगतात. त्यांना त्यांच्या मनावर विचारांची योजनापूर्व विचार करण्याची गरज आहे. योग्य ख्रिस्ती होण्यासाठी त्यांना शिस्तबद्ध योजनांचा अनुभव रोजच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. असे झाले तर ते आपल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे मिशनरी कार्य करु शकतील. ख्रिस्ती पत्रिका किंवा ट्रॅक्सचे वितरण करण्यासाठी ते सक्षम मिशनरी बनतील. अशा लोकांना वैयक्तिकपणे व स्वखुषीने ते कार्य करण्याची क्षमता प्राप्त होईल. यामुळे आपला विश्वास ते योग्यप्रकारे इतरांपुढे मांडतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १२ डिसेंबर १८७८.ChSMar 39.1

    या भगिनी थकत नाहीत तर अति सावध मिशनरी कार्यकर्त्या असतात. या कार्यामध्ये त्या सतत गुंतलेल्या असतात. त्यांना नेहमी यश मिळत जाते. परंतु देवाशी संपर्क असणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्याला सुवार्ता प्रसाराचे पत्र लिहीत असाल तर प्रथम आपली अंत:करणे देवाकडे उंचावून प्रार्थना व विनंती करणे आवश्यक आहे. असे केले तर काही दुर्लक्षित द्राक्षवेल येऊन तुमच्यामध्ये येऊन मिळतील आणि तो एक खरा द्राक्षवेल लाभेल आणि देवाच्या कार्यामध्ये भर टाकण्यासाठी त्याला भरपूर फळे लागतील, त्यामुळे देवाचे गौरव होईल. या कार्यामध्ये जे नम्रपणे देवाच्या कार्यामध्ये सहभागी होतील आणि देवाच्या अंगणात या कार्यात अनुभवाचे शिक्षण घेत त्यांच्या करवी देवाचे गौरव होईल व ते आशीर्वादीत होतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. जून १८८०ChSMar 39.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents