Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  अट्टल फसवेगिरीचे कार्य चालू

  यावेळी जेव्हा जगाच्या शेवटच्या घटना भरभर घडून येतील. सैतान अति जोराने त्याचे कार्य करीत आहे. तो जगाला सुरक्षितेचे आश्वासन देऊन त्यांना फूस लावित आहे. अनेकांना तो फसवून त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या योजना घालीत आहेत आणि तारणाच्या योजनेपासून त्यांची मने दूर करीत आहे. देवाच्या सत्यापासून तो लोकांना दूर नेत आहे. प्रत्येक शहरामधून सैतानाचे हस्तक देवाच्या नियमांविरुद्ध लोकांना भडकविण्यासाठी गुंतले आहेत. ते अट्टल गुन्हेगार आहेत. बंडखोर आहेत, परंतु ते जे करतात ते ज्ञानाप्रमाणे नाही. - अॅक्टस ऑफ द अपोस्टल. २१९.ChSMar 76.1

  सैतान हा बायबलचा हुशार विद्यार्थी आहे. त्याला ठाऊक आहे की त्याची घटिका भरत आली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो देवाचे कार्य खोटे ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. पृथ्वीवर सर्वत्र या गोष्टी घडत आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१६.ChSMar 76.2

  सैतान आता अशा लोकांना शोधीत आहे की जे देवाचे काम करण्यात जे लोक निष्काळजीपणो करतात त्यांना तो रोखून धरतो. त्यांना सत्यापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी त्यांना तराजूमध्ये मोजमाप केले जाईल, परंतु ते उणे भरतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६०.ChSMar 76.3